युवकांनी नागरी सेवांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची गरज असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रीय विधी विद्यालयाच्या पदव्युत्तर विभागात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नागरी सेवा परीक्षांचं प्रशिक्षण देणाऱ्या खासगी शिकवणी वर्गांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये, त्यापेक्षा वेगळ्या वाटा चोखाळण्याचा प्रयत्न करावा असं ते म्हणाले.
Site Admin | August 16, 2024 7:54 PM | Vice President Jagdeep Dhankhad
युवकांनी नागरी सेवांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची गरज – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
