डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या देशवासियांना शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्य दिन हा न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या आदर्शांचा उत्सव असून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया आहे, असं धनखड आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सर्व नागरिकांना २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहनही धनखड यांनी या संदेशातून केलं.

 

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, उच्च न्यायालय अशा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या इमारतींवर तिरंगी रोषणाई कालपासून झळकत आहे. पालघर जिल्ह्यातल्या धामणी धरणावर केलेल्या तिरंगी रोषणाईमधे पाण्याचा विसर्ग चमचमत होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा