डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आदिवासी समुदायाचं भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

आदिवासी समुदायाचं भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान असून आदिवासी आपली ओळख आहेत, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. मध्यप्रदेशातल्या दिंडोरी इथं जागतिक सिकल सेल निर्मूलन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते.

 

सिकलसेल आजाराचं निर्मूल करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून २०४७ मध्ये भारत पूर्णपणे सिकलसेलमुक्त होईल, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला. तसंच आपल्या राज्यघटनेमध्ये आदिवासी समुदायासाठी अनेक विशेष तरतुदी असून त्याची पूर्तता करण्यात सरकारने कोणतीही कसर ठेवली नसल्याचंही धनखड म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा