नवव्या सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिनानिमित्त केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी आज मुंबईतल्या नौदलाच्या गोदीत गौरव स्तंभ इथं देशासाठी बलिदान दिलेल्यांना आदरांजली वाहिली. सशस्त्र सेनांमधून निवृत्त झालेले कर्मचारी हे देशाचा अभिमान आहेत, असं सांगून त्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही सेठ यांनी दिली. अशा कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी गेल्या १० वर्षांमध्ये १ लाख २४ हजार कोटी रुपये खर्च केल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर भारतीय नौदल खलाशी संस्था सागर इथं सशस्त्र सेनांमधल्या निवृत्त कर्मचाऱ्यांशी सेठ यांनी संवाद साधला. नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यावेळी उपस्थित होते.
Site Admin | January 14, 2025 5:32 PM | Sanjay Seth | Veterans Day
सशस्त्र सेनांमधून निवृत्त झालेले कर्मचारी हे देशाचा अभिमान-संजय सेठ
