डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं दीर्घ आजारानं निधन

 

ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० आणि ९०च्या दशकात त्यांनी रंगभूमीवर केलेल्या विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या. प्रायोगिक रंगभूमीवरुन कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कदम यांनी टुरटूर या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगमंचावर पदार्पण केलं. विच्छा माझी पुरी करा, हे त्यांचं वगनाट्य रसिकांनी उचलून धरलं. रुपेरी पडद्यावरही त्यांनी अनेक अनेक भूमिकांमधून सकस अभिनयाचं प्रत्यंतर दिलं. नाट्यदर्पणचा सर्वोत्कृष्ट लोकनाट्य कलाकाराचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विजय कदम यांना समाज माध्यमावरच्या संदेशातून आदरांजली वाहिली आहे. एक अष्टपैलू अभिनेता हरपल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा