डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

चित्रपट सृष्टीसाठीचे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम आणि अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर

पोलीस सेवेतल्या उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातल्या 908 पोलिस अधिकारी कर्मचारी यांना पोलिस पदकं देऊन सन्मानित करण्यात आलं. यामध्ये राज्यातल्या 59 पोलिसांचा समावेश आहे.

राज्यातल्या चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, राजेंद्र बालाजीराव डहाळे, सतीश राघवीर गोवेकर या पोलिस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान करण्यात आलं. यासह राज्यातल्या 17 पोलिस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर 39 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ प्रदान करण्यात आली.

‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ आणि ‘पोलीस शौर्य पदक’, जीवन आणि मालमत्ता यांचं संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिलं जातं. पोलीस सेवेतल्या खास उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ तर कर्तव्यनिष्ठेनं बजावलेल्या गुणवत्तापूर्ण आणि अमूल्य सेवेसाठी ‘पोलिस पदक’ प्रदान केलं जातं.

राज्य सांस्कृतिक कार्य विभागाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना; तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर

सर्वाधिक वाचले

सर्व पहा