लातूर जिल्ह्यात वेळा अमावस्येचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळं आजची अमावस्या शेतकऱ्यांसह सर्वच जणांनी मोठ्या हर्षोल्हासात साजरी केली. या प्रसंगी पिकांची, शेतातल्या धान्याची पूजा करून, विशिष्ट खाद्यपदार्थ बनवून मित्र-परिवारासोबत वनभोजनाचा आनंद आज लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी घेतला.
वेळा अमावस्येचा सण लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा आणि सोलापूर-बीड जिल्ह्याच्या काही भागात तसंच महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागात साजरा केला जातो. या सणाला ‘येळवस’ असंही म्हणतात.