छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था म्हणजे सारथीच्या वतीनं ‘सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ अंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजातील 1500 तरुण-तरुणींना पुढील वर्षी 1 फेब्रुवारीपासून एका महिन्याचं प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल. या गटातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केलं आहे.
Site Admin | December 29, 2024 10:26 AM
सारथीमार्फत मराठा आणि कुणबी तरुणांना वाहन चालक प्रशिक्षण उपक्रम
