डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 2, 2025 8:15 PM | Vasant Panchami

printer

देशभरात वसंत पंचमी उत्साहात साजरी

देशभरात आज वसंत पंचमी साजरी होत आहे. या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा केली जाते, तसंच वसंत ऋतूचं स्वागत करून निसर्गातील नवनिर्मितीचा उत्सव साजरा केला जातो. शिक्षण आणि ज्ञानाचं महत्व सांगणारा तसंच समृद्धी आणि आनंदाचा उत्सव साजरा करणारा हा दिवस असून सर्व देशवासियांना शुभेच्छा देत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमावर लिहिलं आहे. लवकरच भारत जागतिक स्तरावर ज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येवो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

प्रधानमंत्री मोदी यांनीही समाजमाध्यमावर देशवासियांना वसंतपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंढरपुरात आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा साजरा झाला. श्रीलंकेत कोलंबो इथं आज वसंत पंचमीनिमित्त सरस्वती पूजेचं आयोजन करण्यात आलं होत. स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र आणि भारतीय सांस्कृतिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात तिथले भारतीय उत्साहानं सहभागी झाले होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा