हवामान बदल हे आजचे सर्वात मोठं संकट असून जैन समुदायानं शतकानुशतके पाळलेली शाश्वत जीवनशैली हाच त्याचा उपाय असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथे नवकार महामंत्र दिवसानिमित्त आयोजित एका सभेला ते संबोधित करत होते. भारताच्या इतिहासात आणि आध्यात्मिक प्रवासात जैन धर्माचं मोठं योगदान असून जैन साहित्य हे भारताच्या बौद्धिक वैभवाचा कणा आहे. नवकार महामंत्र हा जैन धर्मातल्या अहिंसा, नम्रता आणि आध्यात्मिक उन्नतीच्या तत्वांचा मंत्र आहे. महामंत्राचं महत्त्व फक्त आध्यात्मिक नसून ती जीवनाची गुरुकिल्ली आहे, असंही मोदी म्हणाले. या कार्यक्रमात १०८पेक्षा अधिक देशांतल्या लोकांबरोबर प्रधानमंत्र्यांनी नवकार महामंत्राचा जप केला.
Site Admin | April 9, 2025 1:46 PM | नवकार महामंत्र दिन | प्रधानमंत्री
नवकार महामंत्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन, नवी दिल्लीतल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांचा सहभाग
