डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हातमाग, हस्तशिल्पांची विक्री आणि निर्यात वाढवण्यासाठी देशात विविध उपक्रम – मंत्री गिरीराज सिंह

देशांतर्गत हातमाग आणि हस्तशिल्पांची विक्री आणि निर्यात वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सुरू असलेल्या हातमाग प्रदर्शनात बोलत होते. तरूणांसाठी हातमाग फॅशन बनलं असून अशा कारागिरांना नवीन डिझाईन्स सादर करण्यासाठी नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीबरोबर जोडलं आहे. तसंच भारताचा हातमाग क्षेत्रातला एकूण वाटा ९० टक्के असून ३५ लाखांहून अधिक कुटुंब या क्षेत्रात काम करतात. यावेळी सिंह यांनी उपस्थितांना हर घर तिरंगा मोहिमेचा भाग म्हणून राष्ट्रध्वजाचे वाटप केलं आणि मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा