डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत राबवण्यात आले विविध उपक्रम

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवत आहे. याअंतर्गत काल सांगली शहरात आणि सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर इथं सायकल आणि दुचाकी फेरी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते.

 

धुळे जिल्ह्यात शिरपूर नगरपालिकेनं रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यासह मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती केली. तसंच घरोघरी जाऊन मतदारांना मतदानाचं महत्त्व सांगितलं जात आहे.
कोल्हापूरमध्ये विविध शासकीय तसंच निम शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली. जिल्ह्यातील मतदारांनी इव्होटरप्लेजकोल्हापूर या संकेतस्थळाला भेट देऊन मतदान करण्याची इ प्रतिज्ञा घ्यावी असं आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.

 

नांदेड शहरात मानवी साखळी तयार करुन मतदान जनजागृती करण्यात आली.

 

नंदूरबार शहरात मतदान जनजागृतीसाठी विविध चार गटांत मॅरेथॉन आणि वॉकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शाळांमधले शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा