राज्यात खरीप हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केलं असून, त्याच्या अंमलबजावणीला सुरुवातही झाली आहे. राज्यात २०२४-२५ या वर्षात ५० हजार वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं केलं आहे. त्यापैकी सद्यस्थितीत १४ हजार १०९ वनराई बंधारे बांधून तयार झाले आहेत. या बंधाऱ्याद्वारे सुमारे एक लाख हेक्टरवरची रब्बी पिके, भाजीपाला, फळबागा, फुलशेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. तसंच भूगर्भातली पाणीपातळी वाढण्यासही मदत होईल, असं कृषी आयुक्तालयानं म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात ८६५, लातूर १ हजार २५३, कोकण – ९६३, नाशिक – १ हजार १३४, पुणे १ हजार ८७२, कोल्हापूर १ हजार पाच, अमरावती ३ हजार ५६६, तर नागपूर विभागातन २ हजार ४५० वनराई बंधारे तयार झाले आहेत.