शयनयानयुक्त वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांनी प्रतिताशी कमाल १८० किलोमीटर वेगानं धावण्याच्या कोटा विभागात सुरु असलेल्या तीन दिवसीय चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या या चाचण्या महिनाअखेरपर्यंत सुरु राहणार असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. या एक्सप्रेस गाड्यांची रचना विमानांसारखी असून त्यात स्वयंचलित दरवाजे, अती आरामदायी शयनव्यवस्था तसंच वायफाय सारख्या सोयी सुविधा उपलब्ध असणार आहेत.
देशभरातले रेल्वे प्रवासी सध्या धावत असलेल्या १३६ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमधल्या जागतिक दर्जाच्या प्रवास सुविधांचा लाभ घेत असल्याचं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.