बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. विशेष मकोका सत्र न्यायाधीश सुरेखा आर. पाटील यांच्यासमोर दूरदृश्य प्रणालीद्वारे या प्रकरणाची सुनावणी आज सकाळी झाली. केज इथल्या न्यायालयामध्ये खंडणी प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे.
Site Admin | January 22, 2025 1:51 PM | न्यायालयीन कोठडी | वाल्मिक कराड | संतोष देशमुख
संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
