डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नाट्यमय घडामोडींनंतर वाल्मिक कराड शरण-१४ दिवसांची सीआयडी कोठडी

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसंच पवनऊर्जा प्रकरणात खंडणीचा आरोप होत असलेले वाल्मिक कराड यांना केज न्यायालयानं १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. कराड यांनी काल नाट्यमय घडामोडींनंतर पुण्यात सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली. सीआयडीने त्यांना काल रात्रीच केज न्यायालयात हजर केल्याचं, आमचे प्रतिनिधी रवी उबाळे यांनी कळवलं आहे. ‘‘काल पुण्यात सीआयडी समोर शरण आलेले वाल्मिक कराड यांना सीआयडी ने जुजबी चौकशीनंतर पुण्यातून केज इथं आणलं आणि उप जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना केज न्यायालयात हजर करण्यात आलं.

 

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत, कराड यांना १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सीआयडीसमोर हजर होण्यापूर्वी कराड यांनी स्वतःची एक ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध करून संतोष देशमुख हत्येसह स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले. राजकीय द्वेषापोटी आपल्याविरोधात आरोप केले जात असून, पोलिस तपासात दोषी आढळल्यास न्यायालय जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी आपण तयार असल्याचं कराड यांनी या संदेशात म्हटलं आहे. या नाट्यमय घडामोडीनंतर विरोधी पक्षांकडून तपास यंत्रणेवर टीका होत आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलतांना, मस्साजोगसोबतच परभणीच्या प्रकरणातही सरकारने न्याय मिळवून देण्याची मागणी केली. खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुंबईत पत्रकारांशी बोलताना, परभणी आणि बीड या दोन्ही जिल्ह्यात घडलेल्या या घटनांमध्ये राजकारण न आणता दोन्ही कुटुंबाना न्याय मिळाला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली. आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात थेट कारवाई केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. कराड यांच्या मालमत्तेवर लवकरात लवकर टाच आणावी, अशी मागणी धस यांनी केली. ते म्हणाले.

 

“या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्यांच्या प्रॉपर्टी सीझ करण्याच्या संदर्भात सीआयडी त्यांच्या पाठीमागे फार जोरामध्ये लागले आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडलेलं आहे. लवकरात त्यांच्या प्रॉपर्टी ह्या अटॅच झाल्या पाहिजे. प्रॉपर्टी अटॅच झाल्या शिवाय अन्य गुन्हे करत होते, ते उघडे पडणार नाही.’’

सर्वाधिक वाचले

सर्व पहा