माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल दिल्लीत केंद्र सरकारच्या नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचं उद्घाटन करण्यात आलं. परिवर्तनवादी प्रशासनाच्या तत्वांना अधोरेखित करणारी जनभागीदारी से जनकल्याण ही नव्या दिनदर्शिकेची संकल्पना आहे.
गेल्या दशकभरात विविध क्षेत्रात परिवर्तनात्मक प्रशासनाच्या दृश्य प्रभावावर या दिनदर्शिकेत प्रकाश टाकण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती प्रसारण सचिव संजय जाजू आदी मान्यवर उपस्थित होते.