डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वाढवण बंदरासह विविध विकास कामांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ

पालघर जिल्ह्यात वाढवण इथं ७६ हजार कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या बंदराचं भूमीपूजन, तसंच २१८ मत्स्यपालन विकास योजनेसह विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. हे आशियातल सर्वात मोठं आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरांमधलं एक बंदर असेल. वाढवण बंदरामुळे १२ लाख रोजगार निर्माण होतील, मच्छीमार आणि स्थानिकांच्या जीवनमानात अनेक सुधारणा होतील.

 

स्थानिक मच्छीमारांना transponders चं वाटप त्यांनी केलं. हे transponder बोटीवर लावायचे असून याद्वारे संपर्क व्यवस्था प्रस्थापित करणं सहज शक्य होणार आहे. इस्रोनं विकसित केलेले हे transponder देशातल्या १ लाख बोटीवर लावले जाणार आहेत. यावेळी प्रधानमंत्र्यांनी काही मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्डचंही वाटप केलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा