डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 15, 2024 7:34 PM

printer

व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना जाहीर

१८व्या ‘मिफ’ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना दिला जाणार असल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज केली. चित्रपटांमुळे मनोरंजन तर होतंच, शिवाय आर्थिक वाढीला चालना मिळते आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात, असं ते म्हणाले. भारतीय चित्रपटक्षेत्राच्या वाढीसाठी सरकार वचनबद्ध आहे. माहितीपट, लघुपट, ॲनिमेशनपट निर्मात्यांनी भारतात येऊन चित्रीकरण करावं, असं आवाहन त्यांनी केलं.
‘मिफ’चं औपचारिक उद्घाटन मुंबईत डॉ. एल. मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महोत्सवाचे संचालक पृथुल कुमार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. अभिनेता रणदीप हुडा, अभिनेत्री दिव्या दत्ता, पार्श्वगायक कैलाश खेर आणि इतर यावेळी उपस्थित होते. पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आणि प्रतिष्ठेच्या कान चित्रपट महोत्सवात यंदा ला सिनेफ पुरस्कार पटकवणारा ‘Sunflowers Were The First Ones To Know’ हा लघुपटही आज दाखवण्यात आला. त्यापूर्वी बिली अँड मॉली- ॲन ऑटर लव्ह स्टोरी हा उद्घाटनाचा चित्रपट दाखवण्यात आला. २१ जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात एकंदर ३१४चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा