डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

व्ही. शांताराम आणि स्व. राजकपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर !

मराठी चित्रपट क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी राज्य शासनातर्फे दिला जाणारा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार सन २०२४ साठी अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी आज मंत्रालयात वार्ताहर परिषदेत यासह पाच पुरस्कारांची घोषणा केली. व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे, हिंदी चित्रपट क्षेत्रातल्या योगदानासाठी राजकपूर जीवन गौरव पुरस्कार अभिनेते अनुपम खेर यांना, तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल देवगण यांना जाहीर झाला आहे. यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना मिळाला आहे. 

 

१० लाख रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि चांदीचं पदक असं व्ही शांताराम आणि राजकपूर जीवन गौरव पुरस्काराचं स्वरूप असेल. तर ६ लाख रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि चांदीचं पदक असं विशेष योगदान पुरस्काराचं स्वरूप असेल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा