भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोचे नवे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्याकडून 14 जानेवारी रोजी नारायणन पदभार स्वीकारतील.
नारायणन सध्या केरळमधील वालियामाला इथल्या इस्रोच्या एलपीएससी म्हणजे लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक असून रॉकेट आणि अंतराळयान यांचा दीर्घ अनुभव असलेले ते एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आहेत.