प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातल्या केदारनाथ धाम मंदीराचे दरवाजे आज विधिवत बंद करण्यात आले. हिवाळा ऋतुमुळे भाऊबीजेचा मुहुर्त साधत सकाळी साडेआठ वाजता दरवाजे बंद झाले. या निमित्तानं १० क्विंटल फुलांचा वापर करून मंदीर आणि मंदीर परिसराची सजावट केली आहे. मंदिराचे दरवाजे बंद झाल्यानंतर बाबा केदार यांची पालखीचं उखीमठ इथल्या ओंकारेश्वर मंदिरात हिवाळी निवासासाठी प्रस्थान झालं. दरम्यान, उत्तरकाशीतल्या यमुनोत्री धाम मंदारीचे दरवाजेही आज दुपारी सव्वा बारा वाजता विधिवत बंद केले गेले.
Site Admin | November 3, 2024 4:02 PM | Kedarnath Dham | Uttarakhand
उत्तराखंडमधल्या केदारनाथ धाम मंदीराचे दरवाजे आज विधिवत बंद
