डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 2, 2024 8:14 PM | Uttarakhand

printer

केदारनाथ धाम येथे अडकलेल्या यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू

उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम आणि यात्रा मार्गावर दरड कोसळल्यानं अडकलेल्या यात्रेकरूंचं बचावकार्य आज दुसऱ्या दिवशीही सुरु राहिलं. आज या भागातून दीड हजार भाविकांना पायी चालत तर ६०० जणांना हेलिकॉप्टरमधून सुरक्षित ठिकाणी पोचवण्यात आलं. आतापर्यंत ६ हजारांहून अधिक यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. या कामात मदत करत असलेलं लष्कराचं हेलिकॉप्टर खराब हवामानमुळं आज सकाळी एकच फेरी करू शकलं. एसडीआरएफ, एनडीआरएफ, डीडीआरएफ, स्थानिक पोलीस यांच्या मदतीनं जिल्हा प्रशासनानं बचावकार्य सुरु ठेवलं आहे. या भागात आणखी ५०० हुन अधिक यात्रेकरू अडकलेले असले तरीही ते सुरक्षित आहेत, असं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

 

अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे पुढची सूचना मिळेपर्यंत केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा