जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य एक्स्पो २०२४चं उदघाटन आज उत्तराखंडमधल्या डेहराडून इथं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते झालं. ही आयुर्वेद परिषद जगभरातील तज्ज्ञ, संशोधक आणि अभ्यासकांना एकत्र आणून प्राचीन उपचार परंपरा आणि आरोग्यसेवा उद्योगातल्या अत्याधुनिक नवकल्पनांमधील समन्वय साधण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरेल, असा विश्वास धामी यांनी व्यक्त केला.
Site Admin | December 12, 2024 3:38 PM | CM Pushkar Singh Dhami | Uttarakhand
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य एक्स्पो २०२४चं उदघाटन
