डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

उत्तराखंड इथं 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा समारोप

उत्तराखंड इथं सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा काल समारोप झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते, यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण झालं.

 

उत्तराखंड सरकारनं स्पर्धांचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल शहा यांनी सरकारचं अभिनंदन केलं. 2036 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्यासाठी भारत वचनबद्ध असून यासाठी देश पूर्णपणे सज्ज आहे असं शहा यांनी सांगितलं.

 

39 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मेघालयमध्ये होतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या स्पर्धेत लष्कराच्या संघानं सर्वाधिक 68 सुवर्णपदकं जिंकून पदकतालिकेत प्रथम क्रमांकाचं स्थान मिळवलं. महाराष्ट्रानं 54 सुवर्णपदकांसह एकंदर 201 पदकं जिंकत पदकतालिकेत दुसरं स्थान मिळवलं. महाराष्ट्राची एकंदर पदकसंख्या सर्वात जास्त आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा