डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 6, 2024 3:11 PM | Uttarakhand

printer

उत्तराखंड : ट्रेक मार्गावर अडकलेल्या १४००हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

उत्तराखंडमध्ये केदार खोऱ्यात हवामानात सुधारणा झाल्यानं १४०० हून अधिक लोकांना भारतीय वायुसेनेनं हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी हलवलं. हे सगळेजण पावसामुळं खचलेल्या ट्रेक मार्गावर अडकून पडले होते. याशिवाय वायुदलांनं राज्य सरकारच्या हेलिकॉप्टरद्वारे १३६ यात्रेकरूंची सुखरूप सुटका केली. तर ५०९ यात्रेकरूंना केदारनाथ इथून लिंचोली इथं आणण्यात आलं. याशिवाय गौरीकुंड इथून सोनप्रयाग मार्गे ५८४ जणांची आणि चौमासी मार्गे १७२ जणांची सुटका करण्यात आली. गुरुवारी बचाव कार्य सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ११ हजार ७७५ हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान लष्करानं केदारनाथ राष्ट्रीय महामार्गावरील सोनप्रयाग-गौरीकुंड रस्त्यावर फूटब्रिज बांधण्याचं काम सुरू केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा