उत्तर प्रदेशातल्या पिलभीत जिल्ह्यात आज सकाळी खलिस्तानी अतिरेकी आणि पोलिसांच्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. हे तिन्ही खलिस्तानवादी अतिरेकी १९ डिसेंबर रोजी पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या एका पोलीस चौकीवर झालेल्या हातबॉम्ब हल्ल्यात सहभागी होते. पिलभीत जवळच्या भागात खलिस्तानवादी अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्याच्या पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहिम सुरु केली. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. खलिस्तानी कमांडो फोर्सशी संबंधित असलेल्या या अतिरेक्याकडून पिस्तुलही जप्त केली.
Site Admin | December 23, 2024 12:42 PM | Uttar Pradesh
उत्तरप्रदेशात पोलिसांच्या चकमकीत तीन खलिस्तानी अतिरेकी ठार
![उत्तरप्रदेशात पोलिसांच्या चकमकीत तीन खलिस्तानी अतिरेकी ठार](https://www.newsonair.gov.in/wp-content/themes/newsonair/assets/custom-assets/images/default-post-image.jpg)