डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

उत्तरप्रदेशात बस अपघातात ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी

उत्तरप्रदेशात कनोज जिल्ह्यात आज झालेल्या एका बस अपघातात ८ जण मरण पावले असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. आग्रा लखनौ महामार्गावर कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसने धडक दिल्यामुळे ती उलटली . जखमींना सैफई रुग्णालयात दाखल केलं आहे. जलशक्ती राज्यमंत्री स्वतंत्र देव सिंग यांनी अपघातस्थळी पोचून मदत कार्याची देखरेख केली . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये  तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचं अर्थसहाय्य घोषित केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा