डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 4, 2025 8:52 PM

printer

उत्तर भागात दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम

देशाच्या उत्तर भागात  दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे.  या मार्गावरून दिल्लीकडे जाणाऱ्या सुमारे ४० गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेनुसार पाच तास उशीरा धावत असल्याची माहिती भारतीय रेल्वेनं दिली. यात कालिंदी एक्सप्रेस, रेवा एक्सप्रेस, मलाबोधी एक्सप्रेस, कैफियत एक्स्प्रेस, युपी संपर्क क्रांती, भोपाळ एक्स्प्रेस, हमसफर एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. 

 

प्रवास सुरू करण्यापूर्वी प्रवाशांनी त्यांच्या निर्धारित गाड्यांच्या वेळा तपासून बघाव्यात, असं आवाहन रेल्वेनं केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा