प्रख्यात ओडिया चित्रपट अभिनेते उत्तम मोहंती यांच्यावर आज भुवनेश्वर इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच काल रात्री गुरुग्राममधल्या एका खाजगी रुग्णालयात निधन झालं होतं. यकृताच्या आजारामुळे ते आजारी होते. उत्तम मोहंती यांनी १३० हून अधिक ओडिया चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी शोक व्यक्त केला आहे.
Site Admin | February 28, 2025 8:09 PM | Uttam Mohanty
अभिनेते उत्तम मोहंती यांचं निधन
