युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट- यूएसएड या संस्थेनं बांगलादेशात सुरू असलेले सर्व सहाय्यता कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेच्या अंतर्गत बांगलादेशात होत असलेलं सर्व प्रकारचं काम तातडीनं थांबवण्याच्या सूचना यूएसएडनं काल सर्व सहकारी संस्थांना दिल्या. तत्पूर्वी, आपातकालीन परिस्थितीत अन्नपुरवठा वगळता बांगलादेशाला परदेशातून येणारी सर्व मदत, तसंच इस्रायल आणि इजिप्तला मिळणारी लष्करी मदत अमेरिकेनं शुक्रवारी बंद केली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परदेश धोरणानुसार हे मोठे बदल केले आहेत.
Site Admin | January 26, 2025 8:24 PM | Bangladesh | USAID
बांगलादेशातले सर्व सहाय्यता कार्यक्रम थांबवण्याचा USAID चा निर्णय
