अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या वणव्यात ठार झालेल्यांची संख्या २४ झाली आहे. या वणव्यामुळे अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यात शेती, पायाभूत सुविधा, विस्थापित नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा यांचा खर्चही समाविष्ट करण्यात आला आहे. या आर्थिक नुकसानाचं प्रमाण कॅलिफोर्नियाच्या वार्षिक दरडोई उत्पन्नाच्या ४ टक्के इतकं आहे. त्यामुळे विमा संकट भेडसावत असल्याचं जे. पी मॉर्गन या कंपनीने दिलेल्या विश्लेषण अहवालात म्हटलं आहे.
Site Admin | January 13, 2025 8:29 PM | USA wildfire