अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यानी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उभय नेत्यांनी द्वीपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेतला. ऊर्जा, संरक्षण, धोरणात्मक तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी नोंद घेतली.
तसंच परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली. प्रधानमंत्र्यांनी व्हान्स यांच्या सन्मानार्थ मेजवानीचंही आयोजन केलं होतं. जेडी व्हान्स सहकुटुंब आज जयपूरच्या ऐतिहासिक आमेर किल्ल्याला भेट देतील. त्यानंतर दुपारी व्हान्स भारत अमेरिका व्यापार संबंधांचे भविष्य या विषयावरील उद्योग परिषदेला संबोधित करतील.