अमेरिका युक्रेन यांच्यात आज सौदी अरेबियात चर्चा होणार आहे. सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची काल संध्याकाळी जेद्दा इथं भेट घेतली.
रुबिओ रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांचा भाग म्हणून युक्रेनच्या शिष्टमंडळाची भेट घेणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. अमेरिका आणि युक्रेन यांच्यातल्या खनिज कराराबाबत तपशील निश्चित करणं आवश्यक असल्याचं रुबिओ यांनी म्हटलं आहे.
रशियाच्या हवाई संरक्षण दलानं रशियाच्या कुर्स्क आणि इतर भागात ३३७ युक्रेनियन ड्रोन पाडले असून युक्रेनचा गेल्या तीन वर्षांतील हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला आहे. रशियाशी सुरू असलेलं युद्ध संपुष्टात आणण्यासंदर्भात युक्रेनचं शिष्टमंडळ सौदी अरेबियात अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असताना हा हल्ला करण्यात आला.