अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि ते चालवण्यासाठी शंभर सैनिकांची कुमक इस्रायलला पाठवणार असल्याची घोषणा अमेरिकेने आज केली.
T H A A D अर्थात टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टम नावाची ही क्षेपणास्त्र प्रणाली इस्रायलला पाठवण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टीन यांना दिले आहेत. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर जमिनीवरून मारा करण्याची क्षमता या प्रणालीत आहे. इराणने १ ऑक्टोबरला इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हे पाऊल उचललं आहे.
दरम्यान, इस्रायलमध्ये आपलं सैन्य पाठवून अमेरिका त्यांचा जीव धोक्यात घालत आहे, असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराकची यांनी म्हटलं आहे. कुठल्याही परिस्थितीत इराण आपलं संरक्षण करू शकतो असं ते म्हणाले.