अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी भागीदारी देशांमधून होणाऱ्या आयातीवर भरमसाठ कर लागू केल्यामुळे अमेरिकी शेअर बाजारांमध्ये जोरदार घसरण होऊन ते दोन वर्षातील नीचांकी पातळीवर आले.अमेरिकी रोखे बाजारांनी दुपारपर्यंत २ पूर्णांक सात लाख कोटी डॉलर्स बाजार भांडवल गमावल्याचं वॉल स्ट्रीटच्या बातमीत म्हटलं आहे.
डाऊ इंडस्ट्रियल्स बाजार निर्देशांकात १३ शे अंकांची घसरण झाली तर नॅसडॅक ६ टक्क्यांनी कोसळला तर डाऊ जोन्स दिवसअखेरीस जवळपास ४ टक्क्यांनी घसरला.तत्पूर्वी दिवसाच्या सुरुवातीला आशियापासून युरोपपर्यंतच्या सर्व वित्तीय बाजारपेठांमध्येही जोरदार पडझड दिसून आली.तेलाच्या किंमतीमध्येही प्रती बॅरल २ डॉलर्सहून अधिक घट झाली. जागतिक व्यापार संघटनेनं या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली असून यावर्षी एकूण व्यापारात १ टक्का घट होण्याची शक्यता वर्तवली आहे.