अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी त्यांच्या क्वाड समपदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, जपानचे ताकेशी इवाया आणि ऑस्ट्रेलियाचे पेनी वाँग यांचा समावेश होता. क्वाड ही भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांची राजनैतिक संघटना आहे. त्याअंतर्गत खुल्या, स्थिर आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. रुबियो यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच ही भेट घेतली. क्वाड देशांचे परराष्ट्र मंत्री, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी अमेरिकेत उपस्थित होते. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी मार्को रुबियो यांना परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्त केले आहे.