डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 25, 2025 3:09 PM | Tahawwur Rana

printer

मुंबई दहशतवादी आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

मुंबई दहशतवादी हल्ल्यातला महत्त्वाचा आरोपी तहव्वूर राणा याचा भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. राणा यानं भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. या हल्ल्यातला मुख्य आरोपी डेव्हिड हेडली याचा राणा हा जवळचा सहकारी आहे. अमेरिकेच्या कनिष्ठ न्यायालयानं राणाच्या प्रत्यार्पणाच्या आदेशाला मान्यता दिल्यावर राणा यानं वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, राणासाठी ही अखेरची कायदेशीर संधी उपलब्ध असल्यानं तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पण प्रक्रियेला आता गती मिळणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा