डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 31, 2025 8:07 PM | Russia-Ukraine

printer

रशिया-युक्रेन युद्धबंदीवर अमेरिका आणि रशिया काम करत असल्याचं रशियानं म्हटलं

युक्रेनमधे शांतता प्रस्थापित करण्याच्या शक्य त्या पर्यायांवर अमेरिका आणि रशिया काम करत असल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्सकी  यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर आपण रागावलो असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर रशियानं हे निवेदन दिलं आहे. मात्र दरम्यान रशियानं युक्रेनशी युद्ध सुरुच ठेवलं असून खारकिववर सलग दुसऱ्या रात्री हल्ले केले. 

 

दुसरीकडे स्वीडनच्या सरकारनं युक्रेनला बाराशे कोटी पौंड इतक्या किंमतीची नवीन लष्करी मदत जाहीर केली आहे. युक्रेनला अधिक कंपन्यांची मदत मिळावी, यादृष्टीनं संरक्षण निर्यातीसाठी निर्यातहमीही सुरु करणार असल्याचं स्वीडनचे संरक्षण मंत्री पाल जॉन्सन यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा