अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची सेंट पीटर्सबर्ग इथं भेट घेतली. यावेळी युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. रशियाचे विशेष दूत किरील दिमित्रीव्ह यांनी ही चर्चा फलदायी झाल्याचं म्हटलं आहे. दरम्यान रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता चर्चेला होत असलेल्या विलंबाबद्दल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल निराशा व्यक्त केली. ट्रम्प यांनी रशियाला युक्रेनसोबत युद्धबंदीच्या चर्चेला गती देण्याचं आवाहन केलं आहे.
Site Admin | April 12, 2025 1:07 PM | Russia | US
अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची घेतली भेट
