अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धाबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल पुतिन यांच्यावर टीका केली. रशिया युद्धबंदीला सहमत झाला नाही तर ते रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 50 टक्क्यांपर्यंत शुल्क लादतील असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. तसच युद्ध सुरूच राहिल्यास अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या रशियन तेल आणि इतर वस्तूंवर 25 टक्के शुल्क लावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Site Admin | March 31, 2025 10:22 AM | Russia | US
अमेरिकेचा रशियावर तीव्र संताप
