अमेरिका आणि रशियाने युक्रेनमधील युद्ध संपवण्याच्या उद्देशाने, वाटाघाटी करण्यासाठी पथके नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियातील रियाध इथं काल झालेल्या उच्चस्तरीय चर्चेदरम्यान युक्रेन युद्ध संपवण्यासाठी संभाव्य शांतता कराराचा मार्ग मोकळा करण्याच्या उद्देशाने उभय देशांमधील पहिली चर्चा झाली. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह आणि मुख्य परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह, तर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ आणि पश्चिम आशियाचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
Site Admin | February 19, 2025 9:54 AM | US-Russia
युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्यासाठी पथके नियुक्त करण्याचा अमेरिका-रशियाचा निर्णय
