अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, यावर्षी भारतात होणाऱ्या क्वाड देशांच्या वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी वॉशिंग्टनमधे पत्रकारांशी बोलताना दिली.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडेन यांनी माघार घेतली असल्यानं ते आता अशा अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात, ज्यात ते आधी उपस्थित राहणार नव्हते असं किर्बी यांनी सांगितलं. क्वाड परिषदेचं यजमानपद यावर्षी भारत भूषवणार आहे. क्वाड देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि अमेरिका यांचा समावेश आहे.