डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धा : भारताच्या सुमीत नागलची लढत नेदरलँड्सच्या टॅलन ग्रीक्सपूर याच्याशी होणार

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताच्या सुमीत नागलची लढत येत्या सोमवारी नेदरलँड्सच्या टॅलन ग्रीक्सपूर याच्याशी होणार आहे. यूएस ओपनच्या जुलै महिन्यात झालेल्या मुख्य ड्रॉ मध्ये सुमीतनं स्थान मिळवलं. जागतिक क्रमवारीत सुमीत ७२ व्या क्रमांकावर आहे.

 

दरम्यान, यूएस ओपनमध्ये २४ वेळा ग्रँडस्लॅम विजेता आणि पॅरिस ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावलेला नोव्हाक जोकोविच याची लढत राडू अल्बोट विरुद्ध होणार आहे. तर अव्वल मानांकित जॅनिक सिनर याचा सामना मॅकेन्झी मॅकडोनाल्ड याच्याशी होणार आहे. पहिल्या फेरीत चारवेळा ग्रँडस्लॅम विजेता कार्लोस अल्काराझ याची लढत ली तूशी याच्याशी होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा