डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

न्यूयॉर्कमध्ये आजपासून अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

वर्षातली शेवटची टेनिस ग्रँडस्लॅम यूएस खुली अजिंक्यपद स्पर्धा आजपासून न्यूयॉर्कमध्ये सुरू होणार आहे. भारताचा सुमित नागल आणि रोहन बोपण्णा हे दोघे स्पर्धेत उतरतील. एकाच वर्षात चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या एकेरीत खेळणारा सुमीत नागल २०१९ नंतरचा पहिला भारतीय पुरुष टेनिसपटू ठरला आहे. सध्या तो जागतिक क्रमवारीत ७२व्या स्थानावर आहे. दोनवेळा ग्रँडस्लॅम अजिंक्यपद पटकावणारा रोहन बोपण्णा त्याचा जोडीदार मॅथ्यू एब्देन याच्यासोबत पुरुष दुहेरीत खेळणार आहे. याशिवाय, पुरुष एकेरीत गतविजेता नोव्हाक जोकोविच, फ्रेंच आणि विम्बल्डन अजिंक्यपद विजेता कार्लोस अल्काराज, तसंच अग्रमानांकित यानिक सिनर यांच्यावर टेनिसपटूंचं लक्ष असेल. तर महिला एकेरीत गतविजेती कोको गॉफ, माजी विजेती इगा श्वियांतेक, एलेना रिबाकीना आणि अरीना साबालेंका या चौघी जेतेपदाच्या प्रबळ दावेदार असतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा