अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन आजपासून दोन दिवस भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री डॉ.एस. जयशंकर यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. अंतराळ, संरक्षण आदी क्षेत्रात उभयपक्षी संबंधावर त्यांची चर्चा होणार असून हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात चीनच्या हालचालींविषयीचा मुद्दा त्यात असेल. सुलिवान आयआयटी दिल्ली मधे भारतीय उद्योजकांशी चर्चा करतील. सुलिवान यांचा हिंद- प्रशांत महासागर क्षेत्रातला हा अखेरचा औपचारिक दौरा आहे.
Site Admin | January 5, 2025 12:10 PM | India | Jake Sullivan