मलबार 2024 अंतर्गत भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या नौदलांचा संयुक्त सागरी सराव विशाखापट्टणम इथं गेल्या 9 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. सागरी सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या सरावाचा उद्देश आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात परस्पर कार्यक्षमता वाढविणे आणि भविष्यातील सराव या विषयांवर वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठकादेखील या दरम्यान होत आहेत. सागरी सुरक्षा सुधारण्यासाठी हा संयुक्त सराव , सहकार्य आणि चर्चा निर्णायक ठरणार आहे. सरावाचा बंदर भागातील टप्पा पूर्ण झाल्यावर, उद्यापासून सागरी टप्प्यावरील सारवाला सुरुवात केली जाणार आहे. या सरावामध्ये बंगालच्या उपसागरात परिणामकारक समन्वय राखण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाणार आहे.