नाटो आणि संयुक्त राष्ट्र संघटनेतून अमेरिकेनं बाहेर पडावं या भूमिकेला अमेरिकेच्या शासकीय कार्यक्षमता विभागाचे प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार एलन मस्क यांनी पाठिंबा दिला आहे. आता नाटो आणि यूएनमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे, असं मस्क आपल्या समाजमाध्यमावरल्या पोस्टमधे म्हणाले. संयुक्त राष्ट्राला दिला जाणारा निधी थांबवण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्या सिनेटर ली यांनी ठेवला होता. या भूमिकेला मस्क यांनी पाठिंबा दिला. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोवर टीका करत नाटोतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
Site Admin | March 2, 2025 8:32 PM | DOGE | Elon musk | NATO | USA
नाटो आणि संयुक्त राष्ट्र संघटनेतून अमेरिकेनं बाहेर पडावं या भूमिकेला एलन मस्क यांचा पाठिंबा
