डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी घेतली प्रधानमंत्री मोदी यांची भेट

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गेल्या चार वर्षांतील भारत-अमेरिकेदरम्यानच्या जागतिक धोरणात्मक भागीदारीतील महत्त्वपूर्ण प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. विशेषत: तंत्रज्ञान, संरक्षण, अंतराळ, नागरी आण्विक, स्वच्छ ऊर्जा, सेमीकंडक्टर आणि एआय या प्रमुख क्षेत्रांवर यावेळी भर देण्यात आला. अमेरिकेचे माजी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या विविध भेटींचे स्मरण करून, पंतप्रधान मोदी यांनी भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी बायडेन यांच्या योगदानाचं कौतुक केलं. दोन्ही देशांच्या लोकांच्या हितासाठी आणि जागतिक हितासाठी दोन्ही लोकशाही देशांमधील घनिष्ठ सहकार्य वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला प्रधानमंत्री मोदी यांनी दुजोरा दिला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा