डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 10, 2025 11:05 AM | Los Angeles | US

printer

अमेरिकेतल्या ल़ॉस एंजलीस शहरात वणव्यामुळे ५ जणांचा मृत्यू

अमेरिकेतील लॉस एंजलीस शहरासह आजूबाजूच्या प्रदेशांत वेगाने वणवा पसरत असून, हॉलीवूड सह अनेक प्रदेशात धोका निर्माण झाला आहे. या वणव्यामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांची अधिकृत आकडेवारी अद्याप स्पष्ट झालेली नाही. लॉस एंजलीस काऊंटी मधील सुमारे 1 लाख 80 हजार रहिवाशांना स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वणव्यामुळे लागलेल्या आगीत हॉलीवूड मधील अनेक चित्रपट कलाकार आणि मान्यवरांना घरे गमवावी लागली आहेत. या वणव्यात आतापर्यंत अंदाजे 17 हजार एकरपेक्षा अधिक जमिनीला आगीची झळ बसली असून, या विनाशकारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल शर्तीचे प्रयत्न करत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा